सुमारे 85% श्रीमंत स्वयंनिर्मित आहेत.

 - नशीबामुळे नाही

- प्रतिभामुळे नाही

- श्रीमंत घरात जन्मले म्हणून नाही


ते त्यांच्या सवयींमुळे करोडपती आहेत.


या 8 सवयी तुम्हाला करोडपती बनवतील:


1. दररोज किमान 30 मिनिटे वाचन करा.


वाचनामुळे तुमचे मन चौकटीमधून मुक्त होते. नवीन माहिती आणि ज्ञान मिळते. सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होते.


वाचन हे ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम आणि स्वस्त मार्ग आहे.


विविध प्रकारची पुस्तके वाचा:


- आत्म-विकास (मानसिक आणि अध्यात्मिक)

- यशस्वी व्यक्तींची आत्मचरित्र

- उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक


2. फक्त ज्ञान मिळवत बसू नका, कृती करा, अंमलात आणा.


कृती केल्या शिवाय, अंमलात आणल्याशिवाय तुम्ही मिळवलेले ज्ञान व माहिती तुम्हाला शून्य फायदा/लाभ देईल.


जेव्हा तुम्ही प्रयत्न करून अयशस्वी होतात तेव्हा तुम्ही सर्वात जास्त शिकता.


त्यामुळे प्रयत्न करून अपयशी होण्यास घाबरू नका.


3. स्वत: मध्ये गुंतवणूक करा.


स्व-गुंतवणूक तुम्हाला कोणत्याही स्टॉक किंवा मालमत्तेपेक्षा अधिक ROI देईल.


यामध्ये सातत्याने गुंतवणूक करा:


- पुस्तके

- मार्गदर्शक, गुरु

- अभ्यासक्रम, कोर्सेस


हीच सवय तुम्हाला ९८% लोकांच्या पुढे घेऊन जाईल.


4. सखोल आणि लक्ष केंद्रित काम/कार्य.


काही तासांचे अविचलित काम करणे अत्यंत आवश्यक आहे.


- 3 अग्रक्रमाचे काम/कार्य लिहा

- तुमचा फोन एअरप्लेन मोडवर ठेवा

- काही चांगले संगीत ऐका

- तुम्ही काम/कार्य पूर्ण करण्यापूर्वी उठू नका


हे तुम्हाला 8 तासांचे काम/कार्य अवघ्या 4 तासात पूर्ण करण्यास मदत करेल.


5. तुमच्या वेळेचा मागोवा ठेवा. ट्रेक रेकोर्ड ठेवा.


वेळ ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे.


श्रीमंत लोकांना वेळेचे महत्व माहिती आहे आणि म्हणून ते नेहमी त्यांच्या वेळेचा हुशारीने/सुज्ञपणे वापर करण्याचा प्रयत्न करतात.


तुम्ही तुमचा वेळ कुठे घालवत आहात याचा मागोवा घ्या, ट्रेक करा आणि जिथे तुमचा वेळ वाया जातो ते सर्व रस्ते कायमस्वरूपी बंद करा.


6. तुमचे शरीर आणि मन असे दोन्हींवर काम करा.


तुमच्या यशासाठी तुमचे शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.


तुमचे मन विकसित/उन्नत करण्यासाठी:


- ध्यान करा

- प्रश्न विचारा

- ज्ञान मिळवा


आपल्या शरीराची विकसित/उन्नती करण्यासाठी:


- व्यायाम

- बाहेर फिरायला जा

- सर्व हानिकारक अन्न काढून टाका


7. दिनचर्या/नित्यक्रम ठरवा.


दिनचर्येची/नित्यक्रमाची शक्ती अत्यंत अत्यंत कमी दर्जाची समजली जाते.


हे तुम्हाला बनवते:


- अधिक कार्यक्षम

- तणाव कमी होतो

- स्वयं चालना निर्माण होते


जीवनात सातत्य निर्माण करण्यासाठी दररोज एकाच वेळी झोपा आणि जागे व्हा.


8. दररोज कृती करा/ दिसू द्या.


जे दिवस तुम्हाला सोडून द्यावेसे वाटतात तेच दिवस सर्वात जास्त मोजले जातात.


दररोज कृती करा/ दिसू द्या आणि काही आठवड्यांनंतर हार मानू नका.


दृढनिश्चय, चिकाटी आणि संयम बाळगा. धीर धरा.


तुम्ही शेवटपर्यंत पोहोचला आहात!


वाचल्याबद्दल धन्यवाद!


जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल, तर कृपया:


1. फोलोव करा 

इंस्टाग्राम : udyojakghadwuya

युट्युब : @udyojakghadwuya

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


2. हि पोस्ट शेअर करा.


धन्यवाद
अश्विनीकुमार













 आत्मचिंतन, आत्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण


आज तारीख १ फेब्रुवारी आहे.


१ जानेवारीला नव वर्ष सुरु झाले.


तुमच्याकडे असलेला न भरून निघणारा खजिना म्हणजे वेळ


१ महिना

३१ दिवस

७४४ तास

४४६४० मिनिटे

२६,७८,४०० सेकंद


हा वेळेचा खजिना तुम्ही कसा वापरला?


तुम्ही सर्वांगीण समृद्धीच्या दिशेने जात होता कि नाही?


एक पाउल तरी पुढे गेलात का?


जोशाने सुरुवात केली आणि नंतर एकदम बर्फासारखे थंड पडलात का?


थोडक्यात तुमच्या प्रगतीचा आलेख जो तुम्हालाच तपासायचा आहे.


तुमच्याकडे उरलेला न भरून निघणारा खजिना


११ महिने

३३४ दिवस

४८.७१ आठवडे

८१८४ तास

४९१०४० मिनिटे

२,८८,५७,६०० सेकंद


हा वेळेचा खजिना तुम्ही कसा वापराल हे तुम्ही मागील खजिना कसा वापरला त्यावरून ठरणार आहे.


आयुष्य इंजोय करत जगायचे आहे पण काही ठिकाणी मस्करी चालतच नाही.


स्वतःला जमत असेल तर प्रयत्न करा नाहीतर तज्ञांची मदत घ्या.


धन्यवाद


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

मला त्या माणसाची भीती वाटत नाही ज्याने विविध प्रकारच्या १००० किक मारण्याचा सराव केला आहे, परंतु मला त्या माणसाची भीती वाटते ज्याने १००० वेळा एक किक मारण्याचा सराव केला आहे.


- ब्रूस ली


सर्वकाही एका वेळेस एकाच गोष्टीवर, एकाच कामावर आणि एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याबाबत आहे.


तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जी कृती करता त्याची पुनरावृत्ती व्हावी ह्यावर लक्ष केंद्रित करा.


पुनरावृत्ती तुम्हाला तज्ञ बनवते, तुम्ही प्राविण्य मिळवता. कोणत्याही एका क्षेत्रात प्रभुत्व न मिळवता अनेक क्षेत्रांमध्ये निपुण असणे हे एका विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ असण्यापेक्षा कमी पात्र आहे.


जो एका कौशल्यात सर्वोत्कृष्ट आहे तो सर्व कौशल्यांमध्ये सरासरी असलेल्यांचा आरामात पराभव करेल.


जर तुमच्याकडे एखादे कौशल्य असेल आणि तुम्ही त्याचा दररोज सराव केलात तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात १०० % यशस्वी व्हालच.


धन्यवाद


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

 

ह्या वर्षापासून वापरायच्या सर्वांगीण विकासाच्या काही युक्त्या


• मानसिक आरोग्यासाठी युक्ती

ज्या लोकांचे आवडते विषय हे मानसशास्त्र, मानसिक आरोग्य, ध्यानावरील वैज्ञानिक संशोधन आणि मानसिक दृष्ट्या सक्षम कसे बनायचे हे असतील तर अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• शारीरिक आरोग्यासाठी युक्ती

जी लोक व्यायाम, योगा करत असतील आणि ज्यांचे विषय हे शारीरिक आरोग्य व व्यायाम ह्या बद्दल असतील अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर व्यायाम प्रशिक्षक, योग प्रशिक्षक अश्या शारीरिक आरोग्य आणि व्यायाम विषयातील तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• अध्यात्मिक आरोग्यासाठी युक्ती

जी लोक ध्यान करत असतील, अध्यात्म आणि आयुष्य ह्यावर बोलत असतील, अध्यात्मिक विकास करण्यावर भर देत असतील अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• आर्थिक विकासासाठी युक्ती

ज्या लोकांचे विषय हे पैसा, गुंतवणूक, उद्योग, व्यवसाय आणि नोकरी हे असतील अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर आर्थिक विषयातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• कौटुंबिक विकासासाठी युक्ती

ज्या लोकांचे विषय हे कुटुंबातील वातावरण चांगले कसे रहावे, कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगती कशी होणार आणि कुटुंबातील व्यक्तींचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले कसे राहणार, मुलांची प्रगती कशी होणार असे असतील तर अश्या लोकांच्या संपर्कात, सहवासात  रहा. जर अशी लोक तुमच्या संपर्कात नसतील तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.

• निवड कशी करायची?

आपल्या आजूबाजूला ज्या ज्या लोकांकडून जे जे सकारात्मक घेता येते ते घेणे व जिथे तुम्हाला वाटत असेल कि योग्य व्यक्ती संपर्कात नाही अश्या वेळेस तज्ञांची मदत घेणे.

तुमचे जे ध्येय आहे ते ध्येय समोरच्या व्यक्तीचे देखील असले पाहिजे किंवा त्या व्यक्तीने ते ध्येय पूर्ण केलेले पाहिजे.

• आयुष्यातील न बदलणारे नियम व अटी

नकारात्मक किंवा अयोग्य अशी एखाद दुसरी व्यक्ती जरी तुमच्या संपर्कात असेल तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही. समुद्राच्या मध्यभागी भले मोठे जहाज बुडवण्यासाठी एक छोटेसे छिद्र देखील पुरेसे आहे. 

आयुष्यात दुसरी संधी भेटत नाही, भेटतो तो अनुभव.

धन्यवाद

अश्विनीकुमार 
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

तुमच्या उत्पादन किंवा सेवेची किंमत विनाकारण कमी करण्याची गरज नाही.


 जर तुमचे उत्पादन किंवा तुमची सेवा हि तुमच्यानुसार आणि बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांच्या अनुभवानुसार योग्य असेल तर तुम्हाला विनाकारण किंमत कमी करण्याची गरज नाही. सुरुवातील थोडा वेळ लागेल पण तुमचे उत्पादन किंवा तुमची सेवा हि तुमच्या ग्राहकांद्वारेच इतरांपर्यंत पोहचेल. ग्राहक मूर्ख नाही, त्यांना देखील माहिती आहे कि ते कुठे पैसे खर्च करत आहेत म्हणून. 


भले तुमचे उत्पादन किंवा सेवा त्या तोडीची का असेना पण ग्राहक जो अभिप्राय देतो तो अमुल्य असतो. नंतर बदल करू शकता पण सुरुवातीपासून नको. सतत कमी किमतीत उत्पादने आणि सेवा विकणार्यांवर आता ग्राहक शंका घेत असतात. 


जे नवीन असतात त्यांचे एकदा आपण समजू शकतो आणि दुसरीकडे काही ठराविक लोक ज्यांना ग्राहकाचे हित नाही तर ग्राहकांचा पैसा पाहिजे तेच स्वस्त, कमी किंमत अश्यांचा मारा करत असतात. इथे गरीब श्रीमंत हा प्रश्न नाही. जो गरीब आहे आणि ज्याला खाण्याची आवड आहे तो पंच तारांकित हॉटेल मध्ये सुद्धा खाण्याचा अनुभव घेवून आलेला असतो.


तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवा योग्य दर ठेवून विका, ग्राहक स्वतःहून येतील. 


योग्य पद्धतीने उद्योग व्यवसाय करा, प्रगती हळू हळू होईल पण भक्कम आणि दीर्घकालीन होईल.


धन्यवाद


अश्विनीकुमार 

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

तुमच्याकडे एक अद्भुत रहस्यमय शक्ती आहे.


 तुमच्याकडे एक अद्भुत रहस्यमय शक्ती आहे.

तुमच्याकडे असलेली ती अद्भुत शक्ती पाहिजे ते करू शकते.

रंकाचा राजा करू शकते, राजाचा रंक करू शकते

तुम्हाला एका क्षणात श्रीमंत करू शकते

तुम्हाला एका क्षणात निरोगी करू शकते

एका क्षणात तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू देवू शकते.

तुम्हाला माहिती का ती अद्भुत रहस्यमय शक्ती कुठे दडलेली आहे?

उत्तर नाही सापडत?

बाहेर शोधत आहात?

बाहेर ती अद्भुत शक्ती नाही भेटली?

शोधून दमला आहात?

आता मी सांगतो कि तुमची अद्भुत शक्ती कुठे दडली आहे ती.

तुमची अद्भुत शक्ती दडली आहे ती तुमच्या अंतर्मनात.

जसा मौल्यवान हिरा जमिनीच्या १५० ते २५० किलोमीटर आत सापडतो

अगदी तसेच तुमची अद्भुत शक्ती हि तुमच्या अनंत अंतर्मनात खोलवर दडलेली असते.

तुम्हाला एक नाही तर अनेक शक्ती तिथे मिळून शकतात.

आणि एकदा का तुमच्या अंतर्मनाची शक्ती जागृत केली कि तुमच्यासाठी सर्वकाही शक्य आहे.

तुमच्यासाठी सर्वकाही अगदी अमर्याद उपलब्ध आहे.

तुम्हाला जे पाहिजे ते मिळत जाईल.

तुम्हाला ती अद्भुत शक्ती जागृत करायची आहे?

सोपे आहे.

तुम्हाला सकारात्मक विचार करायची सवय लावून घ्यायची आहे.

सकारात्मक मानसिकता ठेवायची आहे.

सकारात्मक दृष्टीकोन ठेवायचा आहे.

८ तासाची झोप घ्यायची आहे.

जास्तीत जास्त घरचा आहार घ्यायचा आहे.

व्यायाम करायचा आहे.

ध्यान करायचे आहे.

सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहायचे आहे.

आत्मविकास करत रहायचा आहे.

तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहायचे आहे.

समुपदेशन करत रहायचे आहे.

आत्मविकास संलग्न कोर्सेस व उपचार करत रहायचे आहेत.

तुमच्यातील रहस्यमयी अद्भुत शक्ती तुम्हाला तेव्हाच सापडेल, तेव्हाच जागृत होईल जेव्हा तुम्ही सकारात्मक वातावरणात रहाल, सकारात्मक लोकांच्या समुहात रहाल.

सोपे आहे.

नवीन वर्षाच्या १ तारखेपासून तुम्ही मी जे सांगितले आहे त्याचे पालन करा व बघा वर्षाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक बदल झालेला दिसेल.

तुमचे हे संपूर्ण वर्ष सुख, समाधान, आनंद, समृद्धी, भाग्य आणि चमत्काराने भरले गेलेले असेल.

अश्विनीकुमार 
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण